Event Stories

रेशीमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे उद्घाटन - Part I

अंबाजोगाई येथे छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने रेशिमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे उद्घाटन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना आणि धावपळीच्या जीवनात जीवन जगत असताना नात्यागोत्यांचा विसर पडतो की काय अशी अवस्था असताना मोठ मोठ्या शहरांमध्ये वधु वर सुचक केंद्र उभारत आहेत पण सर्वसाधारण शहरातही वधू वर सूचक केंद्राची कमतरता जाणवत असल्याने छत्रपती राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भरत पतंगे आणि पदाधिकारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वधू वर सूचक केंद्र स्थापनेचा निर्धार केला 30 ऑगस्ट रोजी माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे तसेच संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते रेशिमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या रेशीमगाठी वधु वर सुचक केंद्र अनेक रेशीमगाठी बांधण्यात येतील त्यांनी राबविलेला उपक्रम प्रमाणिक असून त्यांच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संत-महंता सह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते

रेशीमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे उद्घाटन - Part II

आजच्या धावपळीच्या युगात विवाह जुळविणे हि जटील समस्या झाली आहे. अनेकांना पात्रता असूनही अपुऱ्या माहितीअभावी सुयोग्य जोडीदार मिळत नाहीत तर कधी कधी अनेकांची फसवणूक होते. त्यामुळे या समस्येचं निराकरण करण्यासाठी आणि अनुरूप जोडीदारांचा विवाह जुळविण्याच्या सामाजिक भावनेतून छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे ‘रेशीमगाठी’ वधु-वर सूचक केंद्र सुरु होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण खात्री करण्यात आलेल्या स्थळांचीच माहिती पुरविण्यात येणार आहे. गुरुवार, दि. ३० ऑगस्ट रोजी बसस्थानकाच्या पाठीमागील जनता लॉज जवळच्या ‘गोवर्धन, इमारतीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. संगीताताई ठोंबरे, माजी आ. अमरसिंह पंडित, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ. पृथ्वीराज साठे, अंबासाखरचे उपाध्यक्ष हनुमंत मोरे, पं.स. सभापती मीनाताई भताने, उपसभापती तानाजी देशमुख, बीड डीसीसीचे संचालक दत्तात्रय पाटील, माजी जि.प. सदस्य संजय दौंड, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, प्राचार्य बी. आय. खडकभावी, समाजसेवक अनिकेत लोहिया, पाणीपुरवठा सभापती बबनराव लोमटे, दिलीप काळे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, उद्योजक उदयसिंह ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

रेशीमगाठी सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पूर्ण

आपल्या मुलीसाठी, मुलांसाठी योग्य जोडीदार असावा ही प्रत्येक आई वडीलांची इच्छा व स्वप्न असते. प्रत्येकाचीच ही इच्छा व स्वप्न पुर्ण होत नाही. आशा काळात अंबाजोगाईत भरतराव पतंगे व त्यांचे सहकारी यांनी मनोहर अंबानगरीत रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्राच्या माध्यमातून योग्य जोडीदार निवडल्याचे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेतला.प्रयत्न सुरू केले.त्याला यशही येवू लागले.लोकांनी या संकल्पनेचे स्वागत केले.आज गुरूवार,दि.30 ऑगस्ट रोजी रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. हे केंद्र का सुरू करावे वाटले हे जाणून घेण्यासाठी संचालक भरतराव पतंगे यांनी सांगितलेला त्यांच्या जिद्दीचा प्रवास वाचकांसाठी देत आहोत.

रेशीमगाठी वधू वर सुचक केंद्रा चे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन - N TV NEwS

अंबाजोगाई (प्रतिनिधी) रेशिमगाठीतून कुटूंब, समाज जोडा व जोडलेल्या समाजातून भक्कम राष्ट्र बांधणी करा असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले.ते अंबाजोगाईत छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘रेशीमगाठी’ वधु-वर सूचक केंद्राच्या कार्यक्रमात बोलत होते. अंबाजोगाईत गुरुवार,दि.३० ऑगस्ट रोजी बसस्थानकाच्या पाठीमागील जनता लॉज जवळच्या ‘गोवर्धन' इमारतीमध्ये ‘रेशीमगाठी’ वधु-वर सूचक केंद्राचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर हे होते.तर यावेळी विचारमंचावर ह.भ.प.महादेव महाराज बोराडे,शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे,माजी आ. पृथ्वीराज साठे, शंकरराव उबाळे (जि.प.सदस्य,बीड), अंबासाखरचे उपाध्यक्ष हाणमंतराव मोरे, पं.स.सभापती मीनाताई शिवहार भताने, उपसभापती तानाजी देशमुख,माजी जि.प. सदस्य संजय दौंड, नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती बबनराव लोमटे,बंडू चौधरी,उध्दवबापु आपेगांवकर,राहूल थोरात हे मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली.प्रारंभी सुभाष शेप,आसाराम जोशी व मंजुषा देशपांडे यांनी बहारदार स्वागतगीत सादर केले.संयोजकांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.याप्रसंगी प्रास्ताविक करताना भरतराव पतंगे यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात विवाह जुळविणे हि जटील समस्या झाली आहे.अनेकांना पात्रता असूनही अपुऱ्या माहितीअभावी सुयोग्य जोडीदार मिळत नाहीत तर कधी-कधी अनेकांची फसवणूक होते.त्यामुळे या समस्येचं निराकरण करण्यासाठी आणि अनुरूप जोडीदारांचा विवाह जुळविण्याच्या सामाजिक भावनेतून छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे ‘रेशीमगाठी’ वधु-वर सूचक केंद्र आपल्या साक्षीने आज सुरु होत आहे.

रेशीमगाठीच्या माध्यमातून चांगल कार्य करावे -ना धंनजय मुंडे

रेशीमगाठी केंद्राच्या माध्यमातून पूर्ण खात्री करण्यात आलेल्या स्थळांचीच माहिती पुरविण्यात येणार आहे. सामाजिक स्तरावर विवाह या प्रक्रियेस अनन्यसाधारण महत्व आहे.या प्रक्रियेमुळे दोन जीवांचे मिलन तर दोन कुटुंबियांचे स्नेहमिलन होते.हि प्रक्रिया अधिक घट्ट आणि मजबूत करण्याच्या भूमिकेतून रेशीमगाठी वधु-वर सूचक केंद्राच्या वतीने सुलभता देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे सांगून भविष्यात वधू वर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणार आहोत.सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा भरतराव पतंगे यांनी व्यक्त केली.यावेळी ह.भ.प.महादेव महाराज बोराडे,शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.तर अध्यक्षीय समारोप करताना ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर यांनी हिंदु धर्मात 42 संस्कार सांगितले आहेत. आजच्या आधुनिक समाजात विवाह व अग्नि हे दोनच संस्कार उरल्याचे सांगुन समाजाची अधोगती होत आहे.विज्ञानाने प्रगती केली.जग जवळ आले पण,माणसे दूर गेल्याचे ते म्हणाले.भरतराव पतंगे व त्यांच्या सहकार्यांनी चांगला उपक्रम सुरू केल्याचे सांगून त्यांनी आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार सदाशिवराव सोनवणे यांनी मानले.याप्रसंगी जि.प.सदस्य शिवाजी सिरसाट,रणजित लोमटे, शिवहार भताने,प्रविण जायभाय,राजेंद्र शेप, माणिकराव बावणे, वसंतराव मोरे, नारायणराव केंद्रे, पञकार दत्ताञय आंबेकर,परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, वैजेनाथ सोनवणे, धनराज काळे,दत्ता मोरे, कल्याणराव काळे, अनिल पिंपळे,मिलिंद बाबजे,बालाजी चौधरी (सरपंच,सोनवळा), गोकुळनाना कदम (सरपंच,कोदरी), खंडेराव टेमकर आदींसहीत अंबाजोगाई, केज,परळी,सोनपेठ, अहमदपुर,कळंब या भागातील उपवर वधु-वरांचे पालक तसेच अंबाजोगाई शहरातील विविध क्षेञातील मान्यवर,पञकार, नागरीक,महिला,युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘रेशीम गाठी वधु-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष),अरूण काळे (उपाध्यक्ष),गणेश पतंगे (सचिव),रघुनाथ जगताप (सहसचिव),दत्ताञय कदम (कोषाध्यक्ष), रामकिसन बडे (सदस्य), सदाशिव सोनवणे (सदस्य) व अमित पतंगे, निलेश पतंगे सर्व पतंगे कुटूंबिय,मिञपरिवार व नातेवाईक यांनी पुढाकार घेतला.

रेशीमगाठी वधू वर सुचक केंद्रा मुळे वधू-वर पित्याची होणारी हेळसांड नक्कीच थांबेल - आमदार विनायक मेटे

आजच्या धावपळीच्या युगात विवाह जुळविणे हि जटील समस्या झाली आहे. अनेकांना पात्रता असूनही अपुऱ्या माहितीअभावी सुयोग्य जोडीदार मिळत नाहीत तर कधी कधी अनेकांची फसवणूक होते. त्यामुळे या समस्येचं निराकरण करण्यासाठी आणि अनुरूप जोडीदारांचा विवाह जुळविण्याच्या सामाजिक भावनेतून छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे ‘रेशीमगाठी’ वधु-वर सूचक केंद्र सुरु होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण खात्री करण्यात आलेल्या स्थळांचीच माहिती पुरविण्यात येणार आहे. गुरुवार, दि. ३० ऑगस्ट रोजी बसस्थानकाच्या पाठीमागील जनता लॉज जवळच्या ‘गोवर्धन, इमारतीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. संगीताताई ठोंबरे, माजी आ. अमरसिंह पंडित, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ. पृथ्वीराज साठे, अंबासाखरचे उपाध्यक्ष हनुमंत मोरे, पं.स. सभापती मीनाताई भताने, उपसभापती तानाजी देशमुख, बीड डीसीसीचे संचालक दत्तात्रय पाटील, माजी जि.प. सदस्य संजय दौंड, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, प्राचार्य बी. आय. खडकभावी, समाजसेवक अनिकेत लोहिया, पाणीपुरवठा सभापती बबनराव लोमटे, दिलीप काळे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, उद्योजक उदयसिंह ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आमदार विनायक मेटे यांच्याकडून रेशीमगाठीची स्तुती

रेशीमगाठी केंद्राच्या माध्यमातून पूर्ण खात्री करण्यात आलेल्या स्थळांचीच माहिती पुरविण्यात येणार आहे. सामाजिक स्तरावर विवाह या प्रक्रियेस अनन्यसाधारण महत्व आहे.या प्रक्रियेमुळे दोन जीवांचे मिलन तर दोन कुटुंबियांचे स्नेहमिलन होते.हि प्रक्रिया अधिक घट्ट आणि मजबूत करण्याच्या भूमिकेतून रेशीमगाठी वधु-वर सूचक केंद्राच्या वतीने सुलभता देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे सांगून भविष्यात वधू वर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणार आहोत.सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा भरतराव पतंगे यांनी व्यक्त केली.यावेळी ह.भ.प.महादेव महाराज बोराडे,शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.तर अध्यक्षीय समारोप करताना ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर यांनी हिंदु धर्मात 42 संस्कार सांगितले आहेत. आजच्या आधुनिक समाजात विवाह व अग्नि हे दोनच संस्कार उरल्याचे सांगुन समाजाची अधोगती होत आहे.